मुंबई : विकेंड आता अधिक रंगतदार होणार आहे. इनऑर्बिट मॉल्सने मॅटेलच्या सहकार्याने आणि क्रॉनिकल्सच्या आयोजनातून ‘यूएनओ चॅम्पियनशिप’ स्पर्धा जाहीर केली आहे. नॉस्टॅल्जिया आणि थरार यांचा मिलाफ असलेली ही स्पर्धा शहरातील खेळप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
वाशी येथील इनऑर्बिट मॉलमध्ये 8 ते 10 मे दरम्यान, तर मालाड येथील इनऑर्बिट मॉलमध्ये 5 ते 7 जून दरम्यान ही चॅम्पियनशिप रंगणार आहे.
शुक्रवार आणि शनिवारी मॉलमध्ये शेकडो स्पर्धक एकाच वेळी ‘यूएनओ’च्या वेगवान फेऱ्यांमध्ये सहभागी होतील. टेबलांवर हास्य, उत्सुकता आणि शेवटच्या पत्त्याचा थरार अनुभवायला मिळेल. रविवारी ‘ग्रँड फिनाले’मध्ये अव्वल स्पर्धक आमने-सामने येतील. तिथे स्पर्धा अधिक तीव्र आणि उत्साह शिगेला पोहोचलेला असेल.
स्पर्धेत दररोजच्या विजेत्याला 6,000 रुपये, तर अंतिम महाविजेत्याला 50,000 रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. एका सामान्य खेळापासून चॅम्पियनशिपच्या विजेतेपदापर्यंतचा हा प्रवास प्रत्येक डाव महत्त्वाचा बनवतो.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना मॉलमधील खास दालनातून मॅटेलचे 159 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे कोणतेही उत्पादन खरेदी करावे लागेल. खरेदी आणि खेळ यांचा अनोखा संगम येथे अनुभवता येणार आहे.
यूएनओ चॅम्पियनशिप हा केवळ खेळ नाही, तर एक सामाजिक कट्टा आहे. येथे अनोळखी लोक मित्र बनतात, कुटुंबातील सदस्य मैत्रीपूर्ण प्रतिस्पर्धी होतात आणि पत्ते खेळण्याचा साधा आनंद एका सामूहिक, उत्साही अनुभवात बदलतो. या उपक्रमातून इनऑर्बिट मॉल्सने पुन्हा एकदा खरेदी केंद्राला ‘आठवणी निर्माण करणारे ठिकाण’ बनवले आहे. त्यामुळे तुमचे ‘ड्रॉ 4’ तयार ठेवा.
