स्थानिक वाहन उत्पादकांना चांगली सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या जागतिक व्यवसायाच्या वाढीला चालना देण्यासाठी एक धोरणात्मक उपक्रम.
२९ मार्च २०२५- पायोनियर कॉर्पोरेशनने आज घोषणा केली की ते २०२६ मध्ये भारतात कारमधील उत्पादनांचे उत्पादन सुरू करतील. २०२३ मध्ये देशात संशोधन आणि विकास केंद्राची स्थापना झाल्यानंतर, या धोरणात्मक पुढाकारामुळे पायोनियर ग्रुपची भारतातील उपस्थिती आणि स्थान आणखी मजबूत होईल, जिथे ऑटोमोटिव्ह उद्योग क्षेत्रात दरवर्षी उल्लेखनीय वाढ होत आहे.
"गतिमान अनुभवांचे भविष्य निर्माण करणे" या कॉर्पोरेट व्हिजन अंतर्गत, पायोनियर स्वतःला एक सोल्यूशन्स कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवत आहे.शिवाय, कंपनी जागतिक क्षेत्रात एक मेजर प्लेयर बनण्याच्या दिशेने पावले उचलत आहे, ज्यामध्ये बाहेरून अधिकारी आणि उद्योगातील दिग्गजांना आणणे आणि भारत आणि जर्मनीमध्ये संशोधन आणि विकास सुविधा स्थापन करणे समाविष्ट आहे.
पायोनियर भारताला जपानबाहेर त्यांच्या प्राधान्य बाजारपेठांपैकी एक मानते. स्थानिक कंत्राटदारांच्या सहकार्याने कारमधील उत्पादनांचे स्थानिक उत्पादन सुरू केल्याने, आम्हाला देशात एंड-टू-एंड व्हॅल्यू चेन स्थापन करण्यात येईल, ज्यामध्ये बी२बी विक्री आणि संशोधन आणि विकास ते उत्पादन आणि डिलिव्हरीनंतरच्या गोष्टींचा समावेश असेल. यामुळे आम्हाला भारतीय वाहन उत्पादकांसोबत आमचा व्यवसाय मजबूत करण्याची एक उत्तम संधी मिळेल. विशेषतः, उत्पादन डिझाइन आणि उत्पादनात स्थानिक गरजा पूर्ण करण्यात मदत होईल, डिलिव्हरीचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करून आणि गरज पडल्यास विक्रीनंतरची सेवा आम्ही त्यांना अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकू. ऑटोमेकर्ससाठी डिस्प्ले ऑडिओ उत्पादनांसह स्थानिक उत्पादन सुरू करण्याचे नियोजन आहे आणि आम्ही फॅक्टरी इन्स्टॉलेशन आणि रिटेल चॅनेल दोन्हीसाठी कारमधील उत्पादनांची विस्तृत श्रेणी समाविष्ट करण्यासाठी उत्पादनाची रेंज वाढवण्याचा विचार करू.
या धोरणात्मक निर्णयावर भाष्य करताना, पायोनियर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीईओ शिरो याहारा म्हणाले, “भारतात कारमधील उत्पादनांचे उत्पादन सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. स्थानिक उत्पादनाकडे वळल्याने आम्हाला स्थानिक वाहन उत्पादकांना त्यांच्या घराच्या जवळ चांगली सेवा देता येईल. वेगाने वाढणाऱ्या भारतीय ऑटो उद्योगातील प्रमुख खेळाडूंपैकी एक बनणे आणि दीर्घकालीन आमच्या जागतिक व्यवसायाच्या वाढीला चालना देणे हे पायोनियरसाठी एक मोठे पाऊल आहे.”
“स्थानिक उत्पादन सुरू झाल्यामुळे, आम्हाला खात्री आहे की भारताप्रती आमची कमिटमेंट पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. स्थानिक ऑटोमोटिव्ह उत्पादकांसोबत जवळची भागीदारी स्थापित करून, आम्ही विकसित होत असलेल्या भारतीय ऑटोमोटिव्ह ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान करू,” असे पायोनियर इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिकेत कुलकर्णी म्हणाले.
भारतात स्थानिक उत्पादन सुरू करणे हे भारत सरकारने देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या आणि प्रोत्साहन दिलेल्या “मेक इन इंडिया” उपक्रमाशी पूर्णपणे सुसंगत आहे आणि जगभरातील ड्रायव्हर्स आणि प्रवाशांना सुधारित गतिमान अनुभव देण्याच्या पायोनियरच्या धोरणाचा देखील एक भाग आहे.