वाशी: एप्रिल २०२५ पासून इनऑर्बिट मॉल वाशीमध्ये वसंत ऋतू-उन्हाळ्याचे स्वागत नवीन सजावटीसह आणि विविध आकर्षक अनुभवांसह केले जात आहे. ऋतूच्या उत्सवाला साजेसा आनंददायक अनुभव देण्यासाठी मॉलमध्ये रंगीबेरंगी सजावट आणि सहभागी होण्यासाठी मजेदार उपक्रमांची रेलचेल आहे. मॉलची सजावट सौम्य आणि नाजूक फुलांच्या रंगछटांनी सजलेली आहे, ज्यात खास काइनेटिक इफेक्ट फुलांचा समावेश आहे. ही फुलं उघडतात आणि बंद होतात, त्यामुळे एक जादुई वातावरण तयार होतं, जे इंस्टाग्रामवर शेअर करण्यासाठी परफेक्ट बॅकड्रॉप बनतंय.
या उत्सवामध्ये विविध डीआयवाय क्रिएटिव्ह अॅबक्टिव्हिटीजचा समावेश आहे, जिथे तुम्हाला स्वतःच्या कल्पनाशक्तीला वाव देता येईल. तसेच, लोकप्रिय ब्रँड्ससोबत खास कोलॅबोरेशनसुद्धा आहे — जसं की सोचबरोबर स्टायलिंग सेशन, प्लम आणि स्टारबक्स बरोबर खास अॅसक्टिव्हिटीज आहेत. दररोज नवीन काहीतरी घेऊन येणाऱ्या फुलांच्या थीमवर आधारित वर्कशॉप्स आणि क्रिएटिव्ह आर्ट सेशन्सच्या माध्यमातून, ह्या स्प्रिंग-समरचा मूड अधिकच खास बनतो.
तुमचा वॉर्डरोब अपडेट करण्याची हीच योग्य वेळ आहे! शॉपर्स स्टॉप, वेस्टसाइड, अझोर्टे, लेव्हीज, स्निच, ओन्ली, व्हेरो मोडा आणि अशा अनेक प्रसिद्ध ब्रँड्सच्या नवीन स्प्रिंग-समर कलेक्शनसह तयार व्हा. इनऑर्बिट मॉल वाशीचा हा रंगीबेरंगी आणि आनंददायक अनुभव परिवार, मित्रमंडळी किंवा जोडप्यांसाठी एक परिपूर्ण डेस्टिनेशन आहे. सर्व अपडेट्ससाठी आणि वातावरणात रंग मिसळण्यासाठी इनऑर्बिट मॉल वाशीच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया पेजेसना फॉलो करा!
🌐 वेबसाइट: https://www.inorbit.in/vashi/
📸 इंस्टाग्राम: @inorbitmallvashi