फक्त दोन वर्षांत बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड २,५२,३८८ फोलिओमध्ये (३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत) ५,४१०.०४ कोटी रूपये एयूएमपर्यंत वाढला आहे
मुंबई : बजाज फिनसर्व्ह एएमसीने त्यांच्या प्रमुख इक्विटी फंड 'बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड'चा दुसरा वर्धापन दिन साजरा केला, ज्याचे 'मेगाट्रेंड्स'मध्ये गुंतवणूक करण्याचे धोरण आहे. या फंडाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे, ज्यामध्ये त्यांची व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता (एयूएम) फक्त दोन वर्षांत ५,४१०.०४ कोटी रूपयांपर्यंत (३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत) वाढली आहे. स्थापनेपासून या फंडाने उत्तम कामगिरी दाखवली आहे, नियमित योजनेअंतर्गत १९.१९ टक्के* आणि प्रत्यक्ष योजनेअंतर्गत २०.९१ टक्क्यांचा* सीएजीआर प्रदान केला आहे (३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत)
तंत्रज्ञान, नियामक बदल, जनसांख्यिकी, पर्यावरण आणि सामाजिक परिवर्तन यांसारख्या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन संरचनात्मक बदलांमध्ये भांडवल गुंतवणूक करून फंड मेगाट्रेंड्स गुंतवणूक धोरणाचा अवलंब करतो. या दूरगामी ट्रेंडचा फायदा घेण्यासाठी स्थित असलेल्या क्षेत्रांना सक्रियपणे ओळखून आणि त्यामध्ये गुंतवणूक करून फंडाचा शाश्वत, दीर्घकालीन वाढ देण्याचा मनसुबा आहे. या फ्रेमवर्कचा वापर करत फंड सध्या ८१ स्टॉक्सच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करतो, प्रत्येक स्टॉकची निवड विकसित होत असलेल्या बाजारपेठेत प्रगती करण्यासाठी केली जाते. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये सक्रिय वाटपांचे मिश्रण एकत्रित करत फंडाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये बँकिंग, वित्तीय सेवा, फार्मास्युटिकल्स व जैवतंत्रज्ञान, विद्युत उपकरणे, औद्योगिक उत्पादने, रिटेल, ग्राहकोपयोगी वस्तू, आयटी सॉफ्टवेअर, रिअल इस्टेट आणि पेये यांचा समावेश आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये सुरू झालेल्या बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंडाने सतत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे, २,५२,३८८ फोलिओमध्ये वाढ झाली आहे (३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत), ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास आणि वेगवेगळ्या बाजार भांडवलात फंडाचा चपळ दृष्टिकोन दिसून येतो. बीएसई ५०० टीआरआयच्या तुलनेत फ्लेक्सी कॅप फंड लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील मेगाट्रेंड संधी व्यापून घेण्यासाठी डिझाइन केला आहे, तसेच हा फंड एएमसीच्या पोर्टफोलिओमध्ये झपाट्याने विकसित होणारी ऑफर बनला आहे.
या फंडाच्या यशाबद्दल मत व्यक्त करत बजाज फिनसर्व्ह एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक गणेश मोहन म्हणाले, ''फ्लेक्सी कॅप फंड आमचा प्रमुख इक्विटी फंड आहे, जो आम्ही एका वेगळ्या मेगाट्रेंड थीमसह सुरू केला होता. फंडाच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त फंडाची वाढ आणि कामगिरी पाहून मला आनंद होत आहे. फंडाच्या वाढीमधून आमच्या गुंतवणूकदारांनी आणि वितरकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास दिसून येतो, तसेच उत्तम कामगिरीमधून बजाज फिनसर्व्ह एएमसीमध्ये आम्ही स्वीकारलेले वेगळे गुंतवणूक तत्व आणि गुंतवणूक प्रक्रिया निदर्शनास येते. भविष्यात, आम्ही आमच्या गुंतवणूक व्यवस्थापन दृष्टिकोनात गतीशील आणि प्रक्रिया-केंद्रित शिस्तीसह अद्वितीय, ट्रू-टू-लेबल फंड तयार करून सर्व भारतीयांसाठी शाश्वत दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.''
या फंडाच्या कामगिरीबाबत सांगत बजाज फिनसर्व्ह एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी निमेश चंदन म्हणाले, ''बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड हा खऱ्या अर्थाने वापरला जाणारा फ्लेक्सी कॅप फंड आहे, जो दीर्घकालीन मेगाट्रेंडचा फायदा घेणाऱ्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करतो. हा फंड आमच्या इन-हाऊस इनक्यूब (INQUBE) गुंतवणूक तत्वाचा वापर करतो, ज्यामध्ये माहिती, संख्यात्मक आणि वर्तणूक पैलूंचे मिश्रण आहे, जे कार्यक्षम स्टॉक निवड आणि वाटप करण्यास मदत करते. फक्त 'प्रवाहाबरोबर जाण्याऐवजी' हा फंड भविष्यात नफा देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून 'प्रवाहाचा अंदाज घेण्यावर' लक्ष केंद्रित करतो. परिणामी, फंडाचा सक्रिय हिस्सा देखील जास्त आहे. हा दृष्टिकोन फंडाला अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलांमधून उद्भवणाऱ्या संधी मिळवण्यास आणि शाश्वत दीर्घकालीन मूल्य प्रदान करण्यास मदत करतो.''